Tuesday, March 22, 2011

दोन नविन टीव्ही मालिका


भविष्यावर बोलू काही हा शरद उपाध्ये यांचा नवा शो सुरु होतोय. एका कुटूंबातल्या सदस्याच्या समस्या आणि त्यावरचा उपाय या शो मधे सांगण्यात येईल. या शोचं सुत्रसंचालन मेघना एरंडे करणार आहे.
झी मराठीच्या भांडा सौख्यभरे ला हा शो काऊंटर करेल.


तसचं कालाय तस्मै नम: ही मालिका ई-टीव्ही मराठीवर सुरु होतेय. यात विक्रम गोखले, अरुण नलावडे, सुलभा देशपांडे, मानसी मागीकर इत्यादी कलाकार आहेत. या मालीकेवर असंभव या गाजलेल्या मालिकेचा प्रभाव आहे.


२१ मार्च पासुन हे दोन्ही शो सुरु होतायत.

Monday, March 21, 2011

सुबोध भावेला दुसरा मुलगा झाला



१५ मार्चला सुबोध भावे दुसऱ्या मुलाचा बाप झाला. पहीला मुलगा कान्हा आणि या नविन बाळात जवळपास ५ वर्षाच अंतर आहे. सुबोधची पत्नी मंजीरी जी पटनी कॉम्प्युटर्स मुंबई येथे जॉब करते ती १ मार्च पासुन लीव्हवर होती. तेंव्हाच याची कुजबुज सुरु झाली होती. अखेर ती लीव्ह मॅटर्नीटी लीव्ह ठरली.

मटा सन्मानचे चित्रपट-रानभूल आणि टीव्ही मालिका-झुंज साठीचे दोन सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार तसेच बालगंधर्व सारख्या भव्यदिव्य चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर कान्स सारख्या अंतरराष्ट्रीय स्तरावर एकुण नवीन फॅमिली मेंबर सुबोधला लकी ठरतोय तर.




Sunday, March 20, 2011

भव्यदिव्य बालगंधर्व कान्समधे


मराठी रंगभूमी आणि नाट्यसंगीताच्या क्षेत्रात सुवर्णयुग निर्माण करणारे नारायण श्रीपाद राजहंस , अर्थात बालगंधर्व यांचा जीवनपट उलगडून दाखवणा-या ‘ बालगंधर्व ’ या मराठी चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर यंदाच्या कान्स इटंरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे.

बालगंधर्व युग सुरू होऊन १०० वर्षं पूर्ण होत असतानाच प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई आणि दिग्दर्शक रवी जाधव या जोडीनं त्यांच्या जीवनावर आधारित ‘ बालगंधर्व ’ या चित्रपटाच्या निर्मिती केली आहे. सुबोध भावेनं यात बालगंधर्वांची भूमिका साकारली आहे, तर संगीताची धुरा कौशल इनामदार यांनी सांभाळली आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये बालगंधर्वच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. आता हा चित्रपट पूर्ण झाला असून ‘ चंद्रकांत प्रॉडक्शन ’ च्या या भव्यदिव्य उपक्रमाचा प्रीमिअरही तितकाच भव्यदिव्य असणार आहे. यंदाच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बालगंधर्वांनी मराठी रंगभूमीला प्रचंड योगदान दिलंय. त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठीच आपण या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘ बालगंधर्व ’ ची भव्यता पाहून अनेक जण स्तीमित झालेत आणि आता ‘ कान्स ’ मध्ये प्रीमिअर झाल्यानंतर भारतीय सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचं स्थान मिळेल, असा विश्वास नितीन देसाई यांनी व्यक्त केला. कान्सशिवाय, व्हेनिस, बर्लिन, टोरांटो इथंही हा चित्रपट दाखवणार असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

येत्या ६ मे रोजी बालगंधर्व भारतात प्रदर्शित होतोय.



Saturday, March 19, 2011

'प्रेमाच्या गावा जावे' मोजके प्रयोग



रमेश भाटकर, रजनी वेलणकर, दीपक करंजीकर, अद्वेत दादरकर आदी कलाकारांना सोबत घेऊन या नाटकाचा शुभारंभ २५ मार्च रोजी मोहन वाघ यांच्या पहिल्या पुण्यातिथीचे औचित्य साधून रात्री आठ वाजता शिवाजी मंदिरमध्ये होणार आहे. त्यांच्या पुण्यातिथीला वेगळ्या तऱ्हेने आदरांजली वाहावी, असे राहुल लिमये यांना वाटत होते. मलाही त्यांची कल्पना आवडली. त्यातून हे नाटक करायचे ठरले,' भुरे यांनी सांगितले. हे एक आनंदी कौटुंबिक नाटक आहे. पिढीतील अंतरामुळे प्रत्येक घरात उडणाऱ्या खटक्यांना येथे खूप छान पद्धतीने अधोरेखित केले आहे. या नाटकाची प्रयोग संख्या आम्ही ठरवली नसून, लोकाश्रय मिळेल तोवर आम्ही याचे प्रयोग करू, असेही भुरे यांनी सांगितले.

१९८३ मध्ये अरविंद देशपांडे, उपेंद दाते, वंदना गुप्ते, निवेदिता जोशी आदी कलाकारांसह वाघ यांनी वसंत कानेटकर लिखित 'प्रेमाच्या गावा जावे' हे नाटक रंगभूमीवर आणलं होतं. या लोकप्रिय नाटकाचे ५५६ प्रयोग झाल्यानंतर हे नाटक थांबले. पुढे १९९२मध्ये अभिनेते सुधीर जोशी यांना घेऊन वाघ यांनी पुन्हा हे नाटक रंगभूमीवर आणले. परंतु १९९२-९३ नंतर याचे प्रयोग झाले नाहीत. परंतु आता तब्बल १८ वर्षांनंतर २५ मार्च रोजी या नाटकाचा प्रयोग शिवाजी मंदिरात रंगणार आहे.

Friday, March 18, 2011

प्रिया बेर्डेच्या मुलाची मुंज

प्रिया बेर्डे आणि लक्ष्मीकांत यांचा मुलगा अभिनयची मुंज नरसोबाची वाडी येथे १५ मार्चला झाली.
काही फोटो...













munj function photos of abhinay, son of actress priya berde and laxmikant berde

Thursday, March 17, 2011

ठाणे महोत्सव


पुणे महोत्सव आणि मुंबई महोत्सव या नंतर आता २७ मार्चला येतोय ठाणे महोत्सव.

शंकर महादेवन यांच्यापासून ते आनंद शिंदेंपर्यंत आणि भरत जाधव यांच्यापासून ते वैभव मांगलेंपर्यंत मराठी आणि हिंदी सिनेजगतातील स्टार्स ठाण्यात आपली अदाकारी पेश करण्यासाठी अवतरणार आहेत. त्या सोबतीने रंगणार आहेत कव्वाली, सुफी संगीत, आगरी कोळी महोत्सव, गोंधळी स्पर्धा आणि ब्रास बॅण्ड स्पर्धा... निमित्त आहे १८ ते २७ मार्च दरम्यान ठाण्यात रंगणाऱ्या ठाणे महोत्सवाचे!

चार वर्षांनंतर ठाणे महोत्सवाचे आयोजन शहरात करण्यात आले असून, २७ मार्चला ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होणारा रंगारंग सोहळा हे या ठाणे महोत्सवाचे खास आकर्षण असेल. प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य व्यासपीठ उभारण्याचे काम मैदानात सुरू आहे. या सोहळ्याला प्रख्यात गायक शंकर महादेवन, शौनक अभिषेकी, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, राहुल देशपांडे, बेला शेंडे, आनंद शिंदे, आनंद भाटे आदी गायकां सोबत सचिन खेडेकर, सचिन पिळगावकर, वर्षा उसगावकर, सुप्रिया, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सतीश तारे, मधुरा वेलणकर, सोनाली कुलकर्णी, रेशम टिपणीस, भार्गवी चिरमुले, अनिकेत विश्वासराव, वैभव मांगले अशी मराठीतील स्टारकास्ट त्या दिवशी दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये अवतरणार आहे.

Wednesday, March 16, 2011

कलाकारांची धुळवड


मराठी कलाकारांच्या मराठमोळ्या धुळवडीला वर्षागणिक नवा रंग चढू लागलाय. मुंबईसह ठाणे, गोरेगाव अशा मुंबईच्या विविध पॉकेट्समध्ये राहणारी कलाकार मंडळी आपापली धुळवड साजरी करत होते. यावेळी मात्र एकमेकांत सामंजस्य दाखवून या सर्व पॉकेट्समधले कलाकार गोरेगावात एकत्रित धुळवड साजरी करतील.

'व्ही २' ग्रुपची शिवाजी पार्कवरची आणि गोरेगावात राहणाऱ्यांची बिंबिसारनगरची अशा दोन सोहळ्यांची चर्चा गेल्या वर्षी झाली. या गटांची मीडियाने दाखल घेतल्यावर हे दोन्ही गट एकत्र आले आणि त्या वादावर पडदा पडला. पण यातून बोध घेत हे सर्व अडीचशे कलाकार गोरेगावच्या आरे कॉलनीत एकत्रित धुळवड साजरी करणार आहेत. 'अवधूत आणि आम्ही गेल्या वर्षी शिवाजी पार्कात जमलो होतो. आता गोरेगावचा नंबर आहे. आम्ही सर्व रंगकर्मी ही धुळवड एकत्रित साजरी करू. आरे कॉलनीतल्या एक रेस्टॉरण्टवर ही धमाल असेल. अवधूत आणि मी पुढचे कार्यक्रम ठरवतोय,' असं श्रीरंग गोडबोले यांनी सांगितलं.

'ठाण्यातला आमचा गट ठरल्याप्रमाणे 'गडकरी 'ला भेटेल. तिथे आम्ही धमाल करू. गोरेगावचं निमंत्रण आम्हा सर्वांना आहेच. २० मार्चला सकाळी आम्ही ठाण्यात जमून छोटी क्रिकेट मॅच खेळू. पण त्यानंतर आम्ही बिंबिसारला जाण्यासाठी निघू,' असं सिनेदिग्दर्शक विजू माने सांगतो.
 marathi actors holi
 actors dhulvad
कलाकारांची धुळवड 
marathi junction.blogspot.com
Related Posts Plugin for WordPress, Blogger...