Showing posts with label सदरक्षणाय. Show all posts
Showing posts with label सदरक्षणाय. Show all posts

Monday, March 7, 2011

नविन चित्रपट 'सदरक्षणाय' - फर्स्ट लुक


मानसी साळवी आठवतेयं?

आशीर्वाद, कर्तव्य, हुकूमत, कोई अपना सा, नूपुर, सौदामिनी यासारख्या अनेक मालिका तिने केलेल्या आहेत. इतक्यात म्हणजे १९ जानेवारीला ती ३१ वर्षाची झाली. हेमंत प्रभु याच्याशी लग्न करुन (आणि एका गोंडस मुलाची आई झाल्यामुळे) ती गायब झाली होती. आता गोदरेज इंटेरियोच्या जाहीरातीतुन ती परत आलीय.

लवकरच ’सदरक्षणाय’ हा मानसी साळवीचा नविन स्त्रीप्रधान चित्रपट येतोय. 'जन्म', 'सुखान्त', 'रीटा', ’मी सिंधूताई सपकाळ’ ह्या स्त्रीप्रधान सिनिमांच कौतुक झाल्यामुळे सध्या मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रधान सिनेमांची लाट आलीय.

पण हा एक वेगळा चित्रपट आहे. यात मी एका कर्तव्यनिष्ठ महिला पोलीसाची भुमिका करतेयं. सर्व महिलांना ही माझ्याकडुन खास महिलादिनाची भेट असल्याचं मानसी आवर्जुन सांगते.


बॅनर: जे.जे.क्रियेशन्स
निर्माता: जयंत गिलातर
दिग्दर्शक: विक्रम लाभे
कलाकार: तुशार दळवी, मानसी साळवी, राहुल फडके, शिशिर शर्मा, सुहिता थत्ते, बाळ धुरी.

::क्षणचित्रे::








Related Posts Plugin for WordPress, Blogger...