आशा भोसले वयाच्या ७७ व्या वर्षी अभिनेत्री म्हणून नवी इनिंग सुरू करत आहेत. ‘माई’ या हिंदी चित्रपटातील मध्यवर्ती भूमिकेत आशाताईंचं दर्शन घडणार आहे.
आशा भोसले यांच्या गाण्यांनी रसिकांना डोलवलं. तसचं आशा भोसले काही म्युझिक व्हिडिओंमधून पडद्यावर आल्या आहेत. पण आता आपल्यातील अभिनयगुणांचं दर्शन घडवण्यासाठी सुभाष दावर-नितीन शंकर यांची निर्मिती असलेल्या ‘ माई ’ या सिनेमामध्ये त्या पद्मिनी कोल्हापुरे यांच्या आईची भूमिका साकारणार आहेत.
एकुलत्या एका मुलानं झिडकारल्यानंतर आपल्या मुलीकडे राहायला जाणा-या आईची ही गोष्ट आहे. हा विषय एक आई म्हणून आणि एक संवेदनशील व्यक्ती म्हणून मनाला भिडल्यानं आपण ही या चित्रपटात काम करणार असल्याचं आशा भोसले यांनी सांगितलं. महेश कोडियाल हे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून येत्या एप्रिलपासून मुंबईत शुटिंगला सुरुवात होणार आहे.