पुणे महोत्सव आणि मुंबई महोत्सव या नंतर आता २७ मार्चला येतोय ठाणे महोत्सव.
शंकर महादेवन यांच्यापासून ते आनंद शिंदेंपर्यंत आणि भरत जाधव यांच्यापासून ते वैभव मांगलेंपर्यंत मराठी आणि हिंदी सिनेजगतातील स्टार्स ठाण्यात आपली अदाकारी पेश करण्यासाठी अवतरणार आहेत. त्या सोबतीने रंगणार आहेत कव्वाली, सुफी संगीत, आगरी कोळी महोत्सव, गोंधळी स्पर्धा आणि ब्रास बॅण्ड स्पर्धा... निमित्त आहे १८ ते २७ मार्च दरम्यान ठाण्यात रंगणाऱ्या ठाणे महोत्सवाचे!
चार वर्षांनंतर ठाणे महोत्सवाचे आयोजन शहरात करण्यात आले असून, २७ मार्चला ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होणारा रंगारंग सोहळा हे या ठाणे महोत्सवाचे खास आकर्षण असेल. प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य व्यासपीठ उभारण्याचे काम मैदानात सुरू आहे. या सोहळ्याला प्रख्यात गायक शंकर महादेवन, शौनक अभिषेकी, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, राहुल देशपांडे, बेला शेंडे, आनंद शिंदे, आनंद भाटे आदी गायकां सोबत सचिन खेडेकर, सचिन पिळगावकर, वर्षा उसगावकर, सुप्रिया, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सतीश तारे, मधुरा वेलणकर, सोनाली कुलकर्णी, रेशम टिपणीस, भार्गवी चिरमुले, अनिकेत विश्वासराव, वैभव मांगले अशी मराठीतील स्टारकास्ट त्या दिवशी दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये अवतरणार आहे.
No comments:
Post a Comment