Saturday, March 19, 2011

'प्रेमाच्या गावा जावे' मोजके प्रयोग



रमेश भाटकर, रजनी वेलणकर, दीपक करंजीकर, अद्वेत दादरकर आदी कलाकारांना सोबत घेऊन या नाटकाचा शुभारंभ २५ मार्च रोजी मोहन वाघ यांच्या पहिल्या पुण्यातिथीचे औचित्य साधून रात्री आठ वाजता शिवाजी मंदिरमध्ये होणार आहे. त्यांच्या पुण्यातिथीला वेगळ्या तऱ्हेने आदरांजली वाहावी, असे राहुल लिमये यांना वाटत होते. मलाही त्यांची कल्पना आवडली. त्यातून हे नाटक करायचे ठरले,' भुरे यांनी सांगितले. हे एक आनंदी कौटुंबिक नाटक आहे. पिढीतील अंतरामुळे प्रत्येक घरात उडणाऱ्या खटक्यांना येथे खूप छान पद्धतीने अधोरेखित केले आहे. या नाटकाची प्रयोग संख्या आम्ही ठरवली नसून, लोकाश्रय मिळेल तोवर आम्ही याचे प्रयोग करू, असेही भुरे यांनी सांगितले.

१९८३ मध्ये अरविंद देशपांडे, उपेंद दाते, वंदना गुप्ते, निवेदिता जोशी आदी कलाकारांसह वाघ यांनी वसंत कानेटकर लिखित 'प्रेमाच्या गावा जावे' हे नाटक रंगभूमीवर आणलं होतं. या लोकप्रिय नाटकाचे ५५६ प्रयोग झाल्यानंतर हे नाटक थांबले. पुढे १९९२मध्ये अभिनेते सुधीर जोशी यांना घेऊन वाघ यांनी पुन्हा हे नाटक रंगभूमीवर आणले. परंतु १९९२-९३ नंतर याचे प्रयोग झाले नाहीत. परंतु आता तब्बल १८ वर्षांनंतर २५ मार्च रोजी या नाटकाचा प्रयोग शिवाजी मंदिरात रंगणार आहे.
premachya gava jaave, mohan wagh, chadraslekha

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...