Showing posts with label sarika nilatkar navathe. Show all posts
Showing posts with label sarika nilatkar navathe. Show all posts

Saturday, February 26, 2011

सारिका निलाटकर-नवाथे परत येतेय

’जास्वंदी' या आगामी नाटकामधली मुख्य अभिनेत्री आहे, सारिका निलाटकर-नवाथे. ही अभिनेत्री म्हणजे केबीसीतल्या त्या पहिल्या करोडपतीची बायको आहे. २००७ मध्ये सारिकाने हर्षवर्धन नवाथेशी लग्न केलं. सारिका मूळ नागपूरची. तिकडे बऱ्याच नाटकात काम केल्यावर ती मुंबईत दाखल झाली. छोट्या पडद्यावर तिने एण्ट्री घेतली ती 'हल्लागुल्ला'ची अँकर म्हणून. तिच्याही करिअरला 'अवंतिका' मधल्या 'मैथिली'ने ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्यानंतर 'चार दिवस सासूचे', 'वंश', 'सात जन्माची कहाणी' या सीरिअल्स, 'मुन्नाभाई एसएससी', 'पहिली शेर दुसरी सव्वाशेर' सारखे सिनेमेही केले. आता ती 'जास्वंदी' मधून पुन्हा रंगमंचावर येतेय. 'केबीसी'मुळे प्रकाशात आलेलं नवाथे हे आडनाव सारिकाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी आता पुन्हा प्रकाशात येईल.

हर्षवर्धन नवाथेही सध्या एका मोठ्या एनजीओचा सीओओ आहे. हर्षवर्धन म्हणतो, '२००० मध्ये मला त्या क्विझमुळे एकदम ग्लॅमर, एक्स्पोजर मिळालं. पण माझे पाय पूर्ण जमिनीवर होते. हा फोकस खूप कमी काळासाठी माझ्यावर असेल हे मी जाणून होतो. त्यावेळी मला आयएएस व्हायचं होतं. 'केबीसी'मुळे आणि त्यानंतरच्या माझ्या हेक्टिक शेड्युलमुळे अभ्यासात खंड पडला. ते स्वप्न अधुरं राहिलं. त्यानंतर मी इंग्लंडमधून एमबीए केलं आणि 'नांदी' या एनजीओच्या रुपाने मला मनासारखं काम गवसलं, हर्षवर्धन सांगतो. सध्या 'नांदी कम्युनिटी वॉटर सव्हिर्सेस' या कंपनीचा तो सीओओ
म्हणून जबाबदारी सांभाळतोय.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...