Friday, March 18, 2011
Thursday, March 17, 2011
ठाणे महोत्सव
पुणे महोत्सव आणि मुंबई महोत्सव या नंतर आता २७ मार्चला येतोय ठाणे महोत्सव.
शंकर महादेवन यांच्यापासून ते आनंद शिंदेंपर्यंत आणि भरत जाधव यांच्यापासून ते वैभव मांगलेंपर्यंत मराठी आणि हिंदी सिनेजगतातील स्टार्स ठाण्यात आपली अदाकारी पेश करण्यासाठी अवतरणार आहेत. त्या सोबतीने रंगणार आहेत कव्वाली, सुफी संगीत, आगरी कोळी महोत्सव, गोंधळी स्पर्धा आणि ब्रास बॅण्ड स्पर्धा... निमित्त आहे १८ ते २७ मार्च दरम्यान ठाण्यात रंगणाऱ्या ठाणे महोत्सवाचे!
चार वर्षांनंतर ठाणे महोत्सवाचे आयोजन शहरात करण्यात आले असून, २७ मार्चला ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होणारा रंगारंग सोहळा हे या ठाणे महोत्सवाचे खास आकर्षण असेल. प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य व्यासपीठ उभारण्याचे काम मैदानात सुरू आहे. या सोहळ्याला प्रख्यात गायक शंकर महादेवन, शौनक अभिषेकी, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, राहुल देशपांडे, बेला शेंडे, आनंद शिंदे, आनंद भाटे आदी गायकां सोबत सचिन खेडेकर, सचिन पिळगावकर, वर्षा उसगावकर, सुप्रिया, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सतीश तारे, मधुरा वेलणकर, सोनाली कुलकर्णी, रेशम टिपणीस, भार्गवी चिरमुले, अनिकेत विश्वासराव, वैभव मांगले अशी मराठीतील स्टारकास्ट त्या दिवशी दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये अवतरणार आहे.
Wednesday, March 16, 2011
कलाकारांची धुळवड
मराठी कलाकारांच्या मराठमोळ्या धुळवडीला वर्षागणिक नवा रंग चढू लागलाय. मुंबईसह ठाणे, गोरेगाव अशा मुंबईच्या विविध पॉकेट्समध्ये राहणारी कलाकार मंडळी आपापली धुळवड साजरी करत होते. यावेळी मात्र एकमेकांत सामंजस्य दाखवून या सर्व पॉकेट्समधले कलाकार गोरेगावात एकत्रित धुळवड साजरी करतील.
'व्ही २' ग्रुपची शिवाजी पार्कवरची आणि गोरेगावात राहणाऱ्यांची बिंबिसारनगरची अशा दोन सोहळ्यांची चर्चा गेल्या वर्षी झाली. या गटांची मीडियाने दाखल घेतल्यावर हे दोन्ही गट एकत्र आले आणि त्या वादावर पडदा पडला. पण यातून बोध घेत हे सर्व अडीचशे कलाकार गोरेगावच्या आरे कॉलनीत एकत्रित धुळवड साजरी करणार आहेत. 'अवधूत आणि आम्ही गेल्या वर्षी शिवाजी पार्कात जमलो होतो. आता गोरेगावचा नंबर आहे. आम्ही सर्व रंगकर्मी ही धुळवड एकत्रित साजरी करू. आरे कॉलनीतल्या एक रेस्टॉरण्टवर ही धमाल असेल. अवधूत आणि मी पुढचे कार्यक्रम ठरवतोय,' असं श्रीरंग गोडबोले यांनी सांगितलं.
'ठाण्यातला आमचा गट ठरल्याप्रमाणे 'गडकरी 'ला भेटेल. तिथे आम्ही धमाल करू. गोरेगावचं निमंत्रण आम्हा सर्वांना आहेच. २० मार्चला सकाळी आम्ही ठाण्यात जमून छोटी क्रिकेट मॅच खेळू. पण त्यानंतर आम्ही बिंबिसारला जाण्यासाठी निघू,' असं सिनेदिग्दर्शक विजू माने सांगतो.
marathi actors holi
actors dhulvad
कलाकारांची धुळवड
marathi junction.blogspot.com
Monday, March 14, 2011
मटा सन्मान २०११ विजेते: टीव्ही मालिका विभाग
मटा सन्मान २०११ विजेते: टीव्ही मालिका विभाग
टीव्ही मालिका
सर्वोत्कृष्ट मालिका - श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी (ई टीव्ही मराठी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - कार्तिक केंद्रे (कस्तुरी)
सर्वोत्कृष्ट पटकथा - कशाला उद्याची बात (अभिजित गुरु)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - सुबोध भावे (झुंज)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - कादंबरी कदम (तुजविण सख्या रे)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता - सतीश पुळेकर (तुजविण सख्या रे)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री - ज्योती बांदेकर (श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी (योगेश जानी, परेश घुमे, बाळू दहिफळे)
सर्वोत्कृष्ट संकलन - कस्तुरी ( दिवेश त्रिपाठी, सर्वेश शुक्ला)
सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत - कस्तुरी
टीव्ही मालिका कथाबाह्य
सर्वोत्कृष्ट मालिका - गर्जा महाराष्ट्र (आयबीएन लोकमत)
सर्वोत्कृष्ट संकल्पना - अमृतवेल (दूरदर्शन सह्याद्री वाहिनी)
सर्वोत्कृष्ट सुत्रधार (पुरुष) - संजय भुस्कुटे (अमृतवेल, दूरदर्शन सह्याद्री वाहिनी)
टीव्ही वृत्तविषयक मालिका
सर्वोत्कृष्ट मालिका - खबर विशेष (सहारा समय)
सर्वोत्कृष्ट सुत्रधार (पुरुष) - संजय पिळणकर (समय शोध, सहारा समय)
सर्वोत्कृष्ट सुत्रधार (स्त्री) - आरती कुलकर्णी (अतुलच्या देवराईत, आयबीएन लोकमत)
मटा सन्मान २०११ विजेते: नाटक विभाग
मटा सन्मान २०११ विजेते: नाटक विभाग
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - विजय केंकरे (वा गुरु)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - दिलीप प्रभावळकर (वा गुरु)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - प्रिया बापट (नवा गडी नवं राज्य)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री - गिरीजा काटदरे (वा गुरु)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता - समीर खांडेकर (मीटर डाउन)
सर्वोत्कृष्ट विनोदी भुमिका - किशोर चौगुले (रामनगरी)
सर्वोत्कृष्ट लेखक - जयंत पवार (काय डेंजर वारा सुटलाय)
सर्वोत्कृष्ट संगीत - संगीत स्वरविभ्रम (कीर्ती शिलेदार)
सर्वोत्कृष्ट नेपथ्य - वा गुरु (प्रदीप मुळ्ये)
सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना - वा गुरु (शीतल तळपदे)
सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक - अनिकेत राशोमान (स्मित, नाशिक)
पहिला भारतीय बोलपट 'आलम आरा'ला आज 80 वर्षे पूर्ण
अर्देशिर इराणी दिग्दर्शित पहिला भारतीय बोलपट 'आलम आरा'ला आज 80 वर्षे पूर्ण झाली... १४ मार्च १९३१ ला मॅजेस्टीक सिनेमा, मुंबई येथे हा चित्रपट प्रदर्शित झाला.
दे दे खुदा के नाम पे प्यारे
ताकद हो गर देने की
कुछ चाहे अगर तो मांग लें मुझसे
हिम्मत हो लेने की
हे त्यातलं गाणं (भारतीय चित्रपटातलं पहिलं गाणं) आणि ते गाणारा वझिर मोहंमद खान हे खुप पॉप्युलर झाले. त्यावेळेस नायक स्व:ताच प्लेबॅक करायचा.
Master Vithal and Zubeida in Alam Ara
alam ara poster
alam ara still
alam ara
Ardeshir Irani recording Alam Ara
Sunday, March 13, 2011
मटा सन्मान २०११ विजेते: चित्रपट विभाग
सर्वोत्कृष्ट चित्रपट - लालबाग परळ (दार मोशन पिक्चर्स)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - महेश मांजरेकर (लालबाग परळ)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - सुबोध भावे (रानभूल)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - राजेश्वरी सचदेव (आरंभ)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता - सिद्धार्थ जाधव (लालबाग परळ)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री - वीणा जामकर (लालबाग परळ)
सर्वोत्कृष्ट पटकथा - लालबाग परळ (महेश मांजरेकर-जयंत पवार)
सर्वोत्कृष्ट गीत - हा नात्यांचा खेळ (सुधीर मोघे-आरंभ)
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - रानभूल (पुष्पांक गावडे)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - अवधूत गुप्ते (झेंडा)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - द्न्यानेश्वर मेश्राम (झेंडा)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायीका - श्रेया घोषाल (आरंभ)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक - उमेश जाधव (रिंगा रिंगा)
सर्वोत्कृष्ट संकलन - लालबाग परळ (सर्वेश परब)
सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म - फॅमिली ड्रामा (चार्वाक फिल्म)
Subscribe to:
Posts (Atom)




























