Thursday, March 31, 2011
Saturday, March 26, 2011
Thursday, March 24, 2011
सिंगल स्क्रिनचा २५ मार्च पासुन संप
महाराष्ट्रातल्या सिंगल स्क्रिनचा २५ मार्च म्हणजे आज पासुन संप आहे. एकुण ६५० थिएटर आठवडाभर बंद रहातील अशी माहीती श्री रमेश सिप्पी यांनी दिली. करमणुक कर कमी करण्यासंदर्भात मागण्यांचा सरकारने विचार करावा अन्यथा हा संप लांबवण्यात येइल अशी माहीती त्यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या जीआर नुसार, सिंगल स्क्रिन बंद करता येत नाही.
दोन घडीचा डाव उद्या रिलीज
उद्या म्हणजे २५ मार्चला नविन मराठी चित्रपट ’दोन घडीचा डाव’ रिलीज होतोय. पीव्हीआर, बिग सिनेमा, फेम, सिनेमॅक्स अश्या सगळ्या मोठ्या थियेटर मधे रीलीज होत असून सुद्धा कुठेही प्रसिद्धी नाही.
ही उदासिनता आहे मराठी चित्रपटाबाबत निर्माता आणि दिग्दर्शकाची. बरं निर्माती आहे कांचन अधिकारी, चित्रपट क्षेत्रातलं एक मोठ नाव. कलाकार आहेत अजिंक्य देव, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे आणि सई ताम्हणकर. ही सर्व कलाकार मंडळी सुद्धा निर्माता/दिग्दर्शका इतकीच उदासीन. कसं होणार मराठी चित्रपट सृष्टीचं???
Tuesday, March 22, 2011
दोन नविन टीव्ही मालिका
भविष्यावर बोलू काही हा शरद उपाध्ये यांचा नवा शो सुरु होतोय. एका कुटूंबातल्या सदस्याच्या समस्या आणि त्यावरचा उपाय या शो मधे सांगण्यात येईल. या शोचं सुत्रसंचालन मेघना एरंडे करणार आहे.
झी मराठीच्या भांडा सौख्यभरे ला हा शो काऊंटर करेल.
तसचं कालाय तस्मै नम: ही मालिका ई-टीव्ही मराठीवर सुरु होतेय. यात विक्रम गोखले, अरुण नलावडे, सुलभा देशपांडे, मानसी मागीकर इत्यादी कलाकार आहेत. या मालीकेवर असंभव या गाजलेल्या मालिकेचा प्रभाव आहे.
२१ मार्च पासुन हे दोन्ही शो सुरु होतायत.
Monday, March 21, 2011
सुबोध भावेला दुसरा मुलगा झाला
१५ मार्चला सुबोध भावे दुसऱ्या मुलाचा बाप झाला. पहीला मुलगा कान्हा आणि या नविन बाळात जवळपास ५ वर्षाच अंतर आहे. सुबोधची पत्नी मंजीरी जी पटनी कॉम्प्युटर्स मुंबई येथे जॉब करते ती १ मार्च पासुन लीव्हवर होती. तेंव्हाच याची कुजबुज सुरु झाली होती. अखेर ती लीव्ह मॅटर्नीटी लीव्ह ठरली.
मटा सन्मानचे चित्रपट-रानभूल आणि टीव्ही मालिका-झुंज साठीचे दोन सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार तसेच बालगंधर्व सारख्या भव्यदिव्य चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर कान्स सारख्या अंतरराष्ट्रीय स्तरावर एकुण नवीन फॅमिली मेंबर सुबोधला लकी ठरतोय तर.
Sunday, March 20, 2011
भव्यदिव्य बालगंधर्व कान्समधे
मराठी रंगभूमी आणि नाट्यसंगीताच्या क्षेत्रात सुवर्णयुग निर्माण करणारे नारायण श्रीपाद राजहंस , अर्थात बालगंधर्व यांचा जीवनपट उलगडून दाखवणा-या ‘ बालगंधर्व ’ या मराठी चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर यंदाच्या कान्स इटंरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे.
बालगंधर्व युग सुरू होऊन १०० वर्षं पूर्ण होत असतानाच प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई आणि दिग्दर्शक रवी जाधव या जोडीनं त्यांच्या जीवनावर आधारित ‘ बालगंधर्व ’ या चित्रपटाच्या निर्मिती केली आहे. सुबोध भावेनं यात बालगंधर्वांची भूमिका साकारली आहे, तर संगीताची धुरा कौशल इनामदार यांनी सांभाळली आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये बालगंधर्वच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. आता हा चित्रपट पूर्ण झाला असून ‘ चंद्रकांत प्रॉडक्शन ’ च्या या भव्यदिव्य उपक्रमाचा प्रीमिअरही तितकाच भव्यदिव्य असणार आहे. यंदाच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
बालगंधर्वांनी मराठी रंगभूमीला प्रचंड योगदान दिलंय. त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठीच आपण या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘ बालगंधर्व ’ ची भव्यता पाहून अनेक जण स्तीमित झालेत आणि आता ‘ कान्स ’ मध्ये प्रीमिअर झाल्यानंतर भारतीय सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचं स्थान मिळेल, असा विश्वास नितीन देसाई यांनी व्यक्त केला. कान्सशिवाय, व्हेनिस, बर्लिन, टोरांटो इथंही हा चित्रपट दाखवणार असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं.
येत्या ६ मे रोजी बालगंधर्व भारतात प्रदर्शित होतोय.
Saturday, March 19, 2011
'प्रेमाच्या गावा जावे' मोजके प्रयोग
१९८३ मध्ये अरविंद देशपांडे, उपेंद दाते, वंदना गुप्ते, निवेदिता जोशी आदी कलाकारांसह वाघ यांनी वसंत कानेटकर लिखित 'प्रेमाच्या गावा जावे' हे नाटक रंगभूमीवर आणलं होतं. या लोकप्रिय नाटकाचे ५५६ प्रयोग झाल्यानंतर हे नाटक थांबले. पुढे १९९२मध्ये अभिनेते सुधीर जोशी यांना घेऊन वाघ यांनी पुन्हा हे नाटक रंगभूमीवर आणले. परंतु १९९२-९३ नंतर याचे प्रयोग झाले नाहीत. परंतु आता तब्बल १८ वर्षांनंतर २५ मार्च रोजी या नाटकाचा प्रयोग शिवाजी मंदिरात रंगणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)