Monday, February 28, 2011

श्रेयस तळपदे स्मॉल स्क्रीनवर


बॉलिवुडमधून श्रेयसला खोऱ्याने ऑफर्स आहेत. तरी एका शोमधून स्मॉल स्क्रीनवर येत इथली दुसरी इनिंग खेळण्यासाठी तो पुन्हा सज्ज झालाय.

बॉलिवुडमधले मोठमोठे सेलिब्रेटी टीव्हीवर येण्याचा ट्रेण्ड असताना आता श्रेयसही पुन्हा एकदा टीव्हीवरून आपल्यासमोर येणार आहे. 'स्टार प्लस'वर लवकरच सुरू होणाऱ्या कॉमेडी का महामुकाबला या शोमध्ये श्रेयस तळपदे, रविना टंडन, अर्शद वारसी आणि शेखर सुमन हे चार सेलिब्रेटी आमनेसामने उभे ठाकतील. हे सेलिब्रिटीज प्रत्येकी चार मेम्बर्सची टीम लीड करत विनोदाचं स्किल प्रेक्षकांसमोर पेश करणार आहेत. कॉमेडियन्स आणि सेलिब्रेटींचा या टीममध्ये समावेश असेल.

आपल्या शोला अधिकाधिक प्रेक्षक मिळावेत म्हणून सेलिब्रेटी आणि नवीन फॉरमॅट आणण्याची चढाओढ सगळ्याच चॅनल्समध्ये लागलेली दिसते. लाफ्टर चॅलेंज आणि सध्या सोनी टीव्हीवर सुरू असणाऱ्या 'कॉमेडी सर्कस' या शोजमधून प्रेक्षकांचं हमखास मनोरंजन होतंय. त्यातूनच कदाचित स्टार प्लसला ही आयडिया क्लिक झाली असल्याची चर्चा आहे.

' दामिनी', 'आभाळमाया' अशा अनेक सीरिअल्समधून श्रेयसने मराठी प्रेक्षकांना आपलंसं केलं होतं. 'युनिट ९' 'एक होता राजा' या त्याच्या शेवटच्या सीरिअल्स. नागेश कुकुनूरचा 'इक्बाल' हा हिंदी चित्रपट केल्यानंतर त्याच्या करिअरची गाडी सुसाट सुटली. 'ओम शांती ओम'नंतर तर तो बॉलिवुडमधला स्टार बनला. सिनेइण्डस्ट्रीतली जोरदार इनिंग सुरू झाल्यानंतर टीव्हीवरून त्याने एक्झिट घेतली. या नव्या शोबद्दल चॅनल आणि श्रेयसने सध्या तरी मौन बाळगलं आहे.

अक्षया भिंगार्डे


२००८ मध्ये झालेल्या स्फोटांत आकिर्टेक्चरच्या शेवटच्या वर्षात शिकणारी मुलगी आपला उजवा हात गमावते. त्यामुळे खचते... गळून जाते. पण पुन्हा जिद्दीने उभीही राहते आणि आकिर्टेक्ट होते. तिच्या जिद्दीची कहाणी दिसेल 'ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस'मधून.

दोन वर्षांपूर्वी 'ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस'मध्ये शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. स्फोटात अनेक जण ठार झाले, कित्येक जखमी झाले. याच जखमींपैकी एक होती आकिर्टेक्चरच्या शेवटच्या वर्षात शिकणारी कोकणातली प्रीती केळकर. या स्फोटात तिने आपला उजवा हात कायमचा गमावला. तरीही ती खचली नाही. त्या परिस्थितीतही अथक प्रयत्नांनी ती उत्तम मार्कांनी आकिर्टेक्ट झाली. तिच्या याच यशोगाथेवर बेतलेला 'ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस' हा मराठी सिनेमा लवकरच प्रदशिर्त होतोय.

जिद्दीची जिगरबाज कहाणी सांगणारा हा सिनेमा दिग्दशिर्त करतायत प्रकाश पांचाळ. 'एका सत्य घटनेवरून आम्हाला या सिनेमाची कल्पना सुचली. यातली सर्व पात्रं, पार्श्वभूमी काल्पनिक आहे. कारण सत्य घटनेतून आम्ही केवळ ती घटना आणि जिद्द उचलली. केळकर कुटुंबाबाबत हा प्रसंग घडतो. केळकर दाम्पत्याची मुलगी प्रीती आकिर्टेक्चरच्या शेवटच्या वर्षात शिकत असते. याच दरम्यान 'ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस'मधून प्रवास करताना, रेल्वेत बॉम्बस्फोट होतो. त्यात ती तिचा हात गमावते,' पांचाळ सांगतात.

या घटनेनंतर त्या मुलीच्या जिद्दीची कहाणी आकार घेते. अनेकदा अशा मुलांसाठी पर्यायी लेखनिकाची सोय असते. परंतु आकिर्टेक्चरला ड्रॉइंग हा वेगळा विषय असल्याने पर्याय नसतो. त्यातून तिचा संघर्ष सुरू होतो. 'प्रीतीच्या

मुख्य भूमिकेत अक्षया भिंगार्डे हा नवा चेहरा दिसेल. शिवाय आनंद अभ्यंकर, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, मंजुषा दातार आदी कलाकार यात आहेत, अशीही माहिती दिग्दर्शकाने दिली. १५ एप्रिलनंतर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

गौरव महाराष्ट्राचा - शोध नव्या सुरांचा


'ई टिव्ही मराठी'वरील लोकप्रिय कार्यक्र्म 'गौरव महाराष्ट्राचा' मधून आता तरुण सुरांचा शोध घेण्यासाठी 'गौरव महाराष्ट्राचा - शोध नव्या सुरांचा' अंतर्गत मराठीतील आजची सर्वात लोकप्रिय आणि आघाडीची संगीतकार जोडी अजय-अतुल या शोध मोहिमेत सामील झाले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच अजय अतुल परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी ह्या निवड चाचण्या पार पडणार आहेत.

गजेंद्र सिंह यांच्या साईबाबा टेलिफिल्म्स ची निर्मिती असलेल्या 'गौरव महाराष्ट्राचा' या कार्यक्रमाचे दोन्ही पर्व तुफान लोकप्रिय ठरले. या नव्या पर्वामध्ये १६ ते २५ वर्षे वयोगटातील गायक गायिकांची निवड करण्यात येणार आहे.

Saturday, February 26, 2011

कलाकारांचा एक्झाम फिव्हर


सध्या सर्वत्र एक्झामचा मौसम आहे. टीव्हीच्या पडद्यावर चमकणाऱ्या अनेक यंग कलाकारांच्या परीक्षा जवळ आहेत. त्यामुळे अनेक सेट्सवर एका बाजूला डायलॉग्जची घोकंपट्टी तर दुसरीकडे अभ्यासाचं पाठांतर असं चित्र पाहायला मिळतंय. मराठी सीरिअल्समधल्या किर्ती नागपुरे (ओळख...ध्यास स्वप्नांचा), आरती मोरे (स्वप्नांच्या पलिकडले) यासारखे अनेक कलाकार अभ्यास आणि शुटिंगमधला समन्वय साधतायंत. यापैकी काही कलाकारांनी सेटवर सध्या कसा एक्झाम फिव्हर आहे ते सांगितलं.

सेटवरच अभ्यास 

डेली सोपचं शुटिंग, नृत्य आणि अभ्यास या तिन्ही गोष्टींचा मेळ साधताना तारांबळ उडते खरी. त्यात आता दिवस परिक्षांचे. त्यामुळे अनेकदा सेटवरच पुस्तकं उघडून बसावं लागतं. शुटिंग मुंबईत असल्याने कॉलेज अटेण्ड करता येत नाही. पण कॉलेज खूप सांभाळून घेतं. मैत्रिणी आणि शिक्षकांकडून नोटस घेऊन अभ्यास भरून काढायचा प्रयत्न करते.
संस्कृती बालगुडे : एसवाय आर्ट्स, एसपी कॉलेज, पुणे 

रियाज चुकवत नाही 

गाण्याचे सगळे प्रोग्राम कॉलेज सांभाळूनच करावे लागतात. म्हणूनच शक्यतो शनिवार-रविवारीच कार्यक्रम घेण्यावर माझा भर असतो. तसंच परीक्षा असली तरीही गाण्याचं शिक्षण आणि सकाळचा रियाजही चुकवून चालत नाही. मग प्रायव्हेट ट्युशन्स, जास्तीचा अभ्यास करून समतोल साधावा लागतो.
प्रथमेश लघाटे, मॉडर्न कॉलेज, पुणे. एफवायजेसी आर्टस. 

समन्वय साधते 

सध्या परीक्षेचे दिवस असल्याने मी फार काही नवं करत नाहीय. पण माझं गाणं मात्र चालूच आहे. संस्कृत, इतिहास आणि पॉलिटिक्स हे तिन्ही माझे आवडीचे विषय असल्याने अभ्यास करणं तसं सोपं जातं. कार्यक्रम, शुटिंग आणि अभ्यास यांच्या शक्यतो मी समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असते. मध्यंतरी 'अमरप्रेम' या सीरिअलचं पुण्यात शुटिंग सुरू होतं आणि दुसऱ्या दिवशी माझा पेपर होता. खूप उशीरा पॅकअप झालं आणि शेवटी रात्री उशिराची बस पकडून मी घरी आले. ती अख्खी रात्र जागून काढली आणि दुसऱ्या दिवशी पेपर दिला.
स्वरांगी मराठे : रुईया कॉलेज, र्फस्ट इयर आर्टस.

सारिका निलाटकर-नवाथे परत येतेय

’जास्वंदी' या आगामी नाटकामधली मुख्य अभिनेत्री आहे, सारिका निलाटकर-नवाथे. ही अभिनेत्री म्हणजे केबीसीतल्या त्या पहिल्या करोडपतीची बायको आहे. २००७ मध्ये सारिकाने हर्षवर्धन नवाथेशी लग्न केलं. सारिका मूळ नागपूरची. तिकडे बऱ्याच नाटकात काम केल्यावर ती मुंबईत दाखल झाली. छोट्या पडद्यावर तिने एण्ट्री घेतली ती 'हल्लागुल्ला'ची अँकर म्हणून. तिच्याही करिअरला 'अवंतिका' मधल्या 'मैथिली'ने ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्यानंतर 'चार दिवस सासूचे', 'वंश', 'सात जन्माची कहाणी' या सीरिअल्स, 'मुन्नाभाई एसएससी', 'पहिली शेर दुसरी सव्वाशेर' सारखे सिनेमेही केले. आता ती 'जास्वंदी' मधून पुन्हा रंगमंचावर येतेय. 'केबीसी'मुळे प्रकाशात आलेलं नवाथे हे आडनाव सारिकाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी आता पुन्हा प्रकाशात येईल.

हर्षवर्धन नवाथेही सध्या एका मोठ्या एनजीओचा सीओओ आहे. हर्षवर्धन म्हणतो, '२००० मध्ये मला त्या क्विझमुळे एकदम ग्लॅमर, एक्स्पोजर मिळालं. पण माझे पाय पूर्ण जमिनीवर होते. हा फोकस खूप कमी काळासाठी माझ्यावर असेल हे मी जाणून होतो. त्यावेळी मला आयएएस व्हायचं होतं. 'केबीसी'मुळे आणि त्यानंतरच्या माझ्या हेक्टिक शेड्युलमुळे अभ्यासात खंड पडला. ते स्वप्न अधुरं राहिलं. त्यानंतर मी इंग्लंडमधून एमबीए केलं आणि 'नांदी' या एनजीओच्या रुपाने मला मनासारखं काम गवसलं, हर्षवर्धन सांगतो. सध्या 'नांदी कम्युनिटी वॉटर सव्हिर्सेस' या कंपनीचा तो सीओओ
म्हणून जबाबदारी सांभाळतोय.

मराठी नाटक जास्वंदी


 ’जास्वंदी' हे नाटक मराठी नाटकांच्या परंपरेत हटकून आठवावं असं. सत्तरच्या दशकात 'कलावैभव' या मातब्बर संस्थेने सादर केलेलं हे नाटक लिहिलं होतं सई परांजपे यांनी आणि त्याच्या दिग्दर्शिका होत्या विजया मेहता. प्रमुख भूमिकेतही त्याच. नाटकात माणसं आणि दोन बोके. नाटक माणसांइतकंच बोक्यांचंही. व्यावसायिक रंगभूमीची चाकोरी सोडून केलेला हा प्रयोग तेव्हा खूप गाजला होता. आता हेच नाटक पुन्हा रंगभूमीवर येतंय. निर्मिती संस्था आहे 'महाराष्ट्र रंगभूमी' आणि यावेळी दिग्दर्शन करताहेत स्वत: सई परांजपे. जुनी नाटकं नव्याने करून बघण्याच्या अलीकडच्या प्रयत्नांत हे नवी 'जास्वंदी' आगमनाआधीच लक्ष वेधून घेते आहे. वयाच्या सत्तरीतही अदम्य उत्साहाने तालमी करणाऱ्या सई परांजपे तरुण पिढीच्या कलावंतांनाही चकित करत आहेत. निर्माते संतोष कोचरेकर 'हा डाव आपण जिंकणार!' अशा ठोक आत्मविश्वासाने निमिर्तीप्रक्रियेत गुंतले आहेत.

'विजयाने केलेला प्रयोग सुंदर होत असला तरी मला तो समाधान देऊन गेला नव्हता. आमचे नाटकाच्या शेवटाबाबत मतभेद झाले होते. विजयाने तिला हवा तोच शेवट केला. त्या नाटकाचं ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी परीक्षण लिहिलं तेव्हा 'विजया मेहतांचा जय सई परांजपेंचा पराजय' असं हेडिंग दिलं होतं. आता मात्र मी माझा शेवट करणार आहे.' सई परांजपे गतस्मृतींना उजाळा देत म्हणाल्या.

विजयाबाईंनी हे नाटक मराठीत केलं तरी हिंदीत सुषमा सेठना प्रमुख भूमिकेत घेऊन सईंनीच दिल्लीत केलं होतं. गुजरातीत तरला मेहता प्रमुख भूमिकेत होत्या. सिंधीतही 'जास्वंदी' 'पंजे' या नावानं झालं.

यावेळी नव्या 'जास्वंदी'त सारिका निलाटकर-नवाथे प्रमुख भूमिकेत आहे. सई म्हणाल्या, 'सोनाच्या भूमिकेसाठी आम्ही बराच शोध घेतला. अनेक नावं सुचवली गेली, पण कुठलंच फूल उमललं नाही. शेवटी ही सारिका उगवली. ती तालमीत मला जे रिझल्ट्स देतेय त्याने मी खूप खुश आहे. नाटकातली ड्रायव्हरची भूमिका यापूवीर् अनेक कलाकारांनी केली, पण आज कोणीही माझ्या लक्षात नाही. पण आता आनंद अलकुंटे ही भूमिका ज्या पद्धतीने करतोय त्याने मी थक्क झालेय. सनी भूषण आणि अजय जाधव हे नाटकातले दोन बोके रोज नवं काहीतरी करुन मला चकित करतात.'

याशिवाय साहील आणि स्वाती बोवलेकर हे कलावंतही नाटकातल्या महत्त्वाच्या भूमिका साकारताहेत. राहुल रानडे संगीताची बाजू सांभाळताहेत. सईंच्या बरोबर काम करताना सर्व कलाकार खुश आहेत. शिस्तीत चालणाऱ्या तालमी, बुजूर्ग असूनही कुठलीही नवी गोष्ट नीट ऐकून घेऊन पटली तर तिचा स्वीकार करणारी दिग्दशिर्का आणि अभिनयाला आव्हान देणाऱ्या व्यक्तिरेखा असा भाग्य आम्हाला एरवी कधी मिळणार, असा तेच प्रश्न करतात आणि आपलीही नाटकाबद्दलची उत्सुकता वाढवतात.

Friday, February 25, 2011

शाळा पोस्टर्स


 शाळा पोस्टर्स








 shala posters


शाळा या कादंबरीवर आधारीत चित्रपट


मिलिंद बोकिल यांच्या गाजलेल्या शाळा या कादंबरीवर आधारीत चित्रपट येतोय. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलय सुजय डहाके यांनी.

यातलं मुकुंद जोशी हे पात्र अंशुमन जोशी याने केलयं आणि शिरोडकर रंगवलीय केतकी माटेगावकर हीने.

‘९वि’तले काही मित्र शाळा भरण्याआधी एका बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंग मधे जमून भंकस करत असतात. हेडमास्टरच ऑफीस, परीक्षा, मुली, वर्गातल्या पिक्चरच्या भेंड्या, सहल, NCC, स्काउट, पौगांडावस्था, मुलींबद्दल वाटणारी ओढ, मैत्री, मैत्रीतली भांडण हे सर्व अगदी आपलं वाटत.

कादंबरी चा नायक मुकुंद जोशीच (हे नाव सलग कुठेच येत नाही) शिरोडकर वर असलेल प्रेम (पुस्तकात त्याला लाइन हा शब्द वापरला आहे) त्यातल यश आणि अपयश हे अतिशय तरल आहे.

त्या दिवशी मला कळलं की शाळेतली मजा कशात आहे ते. वर्ग आहेत, बाकं आहेत, पोरंपोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्रसुद्धा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यासारखे मुक्त आहोत. ह्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. त्या शाळेला वर्ग नाहीत, भिंती नाहीत, फळा नाही, शिक्षक नाहीत पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे.

तर तयार रहा जोशी, सुऱ्या, फावड्या, चित्रे आणि हो... आपल्या लाडक्या शिरोडकरला भेटायला.



The screenplay of this film has been adapted from the best selling novel of the same name, by reputed Marathi novelist Milind Bokil. Say’s director Sujay Dahake. The movie is an attempt to bring to life on screen, the very essence of pure, unrequited love that the character Joshi feels for his classmate, Shirodkar

राडा रॉक्स फोटो

 राडा रॉक्स













raada rox
this movie was produced by smita thakarey to launch her son rahul thakarey. rahul is the grand sun of shiv sena chief bal thakarey

Thursday, February 24, 2011

हमिदाबाईची कोठी

अभिनेत्याच्या भूमिकेतून निर्मात्याच्या भूमिकेत आलेला सुनील बर्वे नव्याने आणत असलेले ‘हमिदाबाईची कोठी’ नाटक वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. या नाटकाचे हक्क तहहयात आपल्याकडेच असल्याचा दावा निर्माता उदय धुरत यांनी केल्याने सुनील बर्वे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

अभिनेत्याच्या भूमिकेतून निर्मात्याच्या भूमिकेत आलेला सुनील बर्वे नव्याने आणत असलेले ‘हमिदाबाईची कोठी’ नाटक वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. या नाटकाचे हक्क तहहयात आपल्याकडेच असल्याचा दावा निर्माता उदय धुरत यांनी केल्याने सुनील बर्वे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.


सुनील बर्वे यांनी ‘हर्बेरियम’ या नावाने पाच जुन्या कलाकृती रंगमंचावर आणून त्यांचे प्रत्येकी 25 प्रयोग करणार, अशी घोषणा काही महिन्यांपूर्वीच केली आहे. यातील ‘सूर्याची पिल्ले’ आणि ‘लहानपण देगा देवा’ ही दोन नाटके नव्या संचात रंगभूमीवर आली आणि त्यांना जोरदार यशही मिळाले. अनिल बर्वेलिखित ‘हमिदाबाईची कोठी’ हे या मालिकेतील तिसरे नाटक ‘लहानपण देगा देवा’च्या पंचविसाव्या प्रयोगानंतर प्रेक्षकांसमोर याबाबत घोषणा होईल, असे कळते. एका वेश्येच्या जीवनावर आधारित हे नाटक 1979  मध्ये उदय धुरत यांच्या ‘माऊली प्रॉडक्शन’ने रंगमंचावर आणले होते. विजया मेहता दिग्दर्शित या नाटकातून नाना पाटेकरांनी रंगभूमीवर पदार्पण केले होते. अत्यंत गाजलेल्या या नाटकात नीना कुलकर्णीही होत्या. त्याचे 250  प्रयोग झाले होते. 


ते चंद्रकात कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाखाली नव्याने आणण्यासाठी सुनील बर्वे यांनी रिहर्सलही सुरू केली असून अनिल बर्वे यांच्या पत्नी प्रेरणा यांच्याकडून रीतसर हक्क घेऊनच हे नाटक करत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘उदय धुरत यांनी अनेक वर्ष ते नाटक केलेले नाही. त्यांच्याकडे नेमके कोणते हक्क आहेत, हे  ठाऊक नाही. पण हे प्रकरण सामोपचाराने सोडवायचे आहे. धुरत यांना भेटून त्यांची समजूत घालू,’’ असेही बर्वे म्हणाले. दुसरीकडे धुरत म्हणतात की, ‘‘हमिदाबाईची कोठी’चे हक्क तहहयात माझ्याकडे आहेत. नाटक रंगभूमीवर आले तेव्हाच लेखक अनिल बर्वे यांच्याकडून मी ते घेतले आहेत. त्यांना नाटकाचा पेन मनीही दिला आहे. तो दिल्यावर नाटक निर्मात्याचे होते. त्यामुळे दुसरा कुणी निर्माता हे नाटक करत असल्यास योग्य वेळी निर्णय घेऊ.’ 


कॉपीराइट कायद्यानुसार एखाद्या निर्मात्याने पाच वर्षे नाटकाचे प्रयोग केले नसतील, तर नाटककार ते दुस-या निर्मात्याला देऊ शकतो. परंतु हा कायदा 1995 मध्ये आल्याने त्यापूर्वीच्या आलेल्या नाटकांना लागू होत नाही. त्यामुळे ‘हमीदाबाईची कोठी’ या कायद्याच्या कक्षेत येत नाहीत, असेही त्यांनी सांगितले. याच मुद्दय़ावर ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’चे लेखक प्रदीप दळवी यांच्याविरोधात खटला जिंकला होता, अशी माहितीही त्यांनी दिली.


sunil barve presents marathi natak hamidabaichi kothi

डावपेच ऑन लोकेशन फोटोस

 डावपेच हा नविन मराठी चित्रपट आज म्हणजे २५ फेब्रुवारीला रिलिज होतोय... या चित्रपटाचे ऑन लोकेशन फोटोस












new marathi movie davpech is releasing today. on location report...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...