नियतीने एक विचित्र खेळ योगिनी चौक सोबत केला. ज्या वडीलांनी तीला अभिनयात करियर करण्यासाठी प्रोत्साहीत केलं, आणि नुसतं प्रोत्साहीतच नाही केलं तर एक मार्ग दाखवला त्यांनाच नियतीने योगिनीपासून तीच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या रिझल्टच्या दिवशीच हिरावून घेतलं. वडीलांबद्दल बोलतांना योगीनी हळवी होते. "आज जेंव्हा जेंव्हा मी पर्फॉर्मन्स देते, मला खात्री आहे की तेंव्हा तेंव्हा पप्पा मला नक्की बघत असतील."
लहानपणापासूनच तिने भरतनाट्यम आणि मोहिनीअट्टम् या नृत्यांच जवळ जवळ १० वर्ष ट्रेनींग घेतलं आहे. नंतर पुढे रुईया कॉलेजला असतांना तीला अभिनयाची अनेक बक्षिसं मिळाली आहेत. तीची अभिनयाची आवड बघुन तीच्या वडीलांनी तीला अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मधुन अभिनयाचा कोर्स करायला लावला. झी मराठीवर ’महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या रियॅलीटी शोची ऑडिशन्स जाहीर झाली. योगिनीने या रियालीटी शो मधे भाग घेतला. यात योगिनी बेस्ट फिमेलचा अवार्ड मिळवून विनर ठरली.
तीच्या अभिनयामुळे योगिनिला झी मराठी कडून ’भाग्यलक्ष्मी’ मालीका करण्यासाठी ऑफर आली. त्याचप्रामाणे काही मराठी चित्रपट सुद्धा ती करतेय. महेंद्र कदम दिग्दर्शित ’सुपरस्टार’ मधे ती सिद्धार्थ जाधव सोबत दिसणार आहे. अरुण नलावडेंच्या ’वर्षा’ चित्रपटात सुद्धा ती आहे. पण सगळ्यात चांगली ऑफर तीला वामन तावडेंच्या द्विभाषीक चित्रपट 'चिना' (हिंदी/मराठी) साठी मिळाली. यात स्मिता पाटीलने भुमीका केली होती. स्मिता पाटीलने केलेली भुमिका करणे ही कुठल्याही अभिनेत्री साठी अभिमानाची गोष्ट आहे. याशिवाय शाफत खान यांच पोपटपंची हे नाटक ती करतेय.
आता तिच्या वडीलांच स्वप्न पुर्ण करणं हेच तीचं ध्येय आहे. योगिनीला अनेकानेक शुभेच्छा!!
’वाशीची राणी’ हा प्रत्येक वर्कींग वूमनच्या काळजाला हात घालणारा योगिनीचा पर्फॉर्मन्स अवश्य पहा:

superb performance
ReplyDeletethanks a lot yaar!!!
ReplyDelete