Saturday, March 5, 2011

सप्तरंग



महाराष्ट्र शासनाने गेल्या तीन वर्षांपासून मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाच्या प्रासादात गीत-संगीत-वादन-नृत्यांचे कार्यक्रम घेऊन, हुतात्म्यांच्या शौर्याला आणि मुंबईकरांच्या धैर्याला मानवंदना देण्याची परंपरा 'सप्तरंग' महोत्सवाच्या माध्यमातून सुरू केली. ती याही वर्षी त्याच धीरगंभीर वातावरणात सुरू झाली. यावषीर्ची सुरुवात भल्या पहाटेच्या 'स्पिरिच्युअल मॉर्निंगने' झाली. उस्ताद अमजद अली खान आणि उत्साद झाकीर हुसेन यांच्या स्वगीर्य वादनाने श्रोते आणि ही वास्तू धन्य झाली! उस्ताद अमजद अली खां साहेबांनी यावेळी व्यक्त केलेली भावना - 'महाराष्ट्र शासन सही जगहपर सही रागों का आयोजन कर सही काम कर रही है', आयोजनाची पावती देऊन गेले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातफेर् दि. १८ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत मुंबईतविविध सात ठिकाणी आयोजित हा सांस्कृतिक सोहळा मुंबईकरांना अविस्मरणीय मेजवाणी देवून गेला.



संध्याकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे व राज्यमंत्री फौजिया खान यांच्या उपस्थितीत लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना, त्यांच्या संगीत क्षेत्रातील उत्तुंग योगदानाबद्दल लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर त्यांनी गाईलेल्या अवीट गोडीच्या ठसकेबाज, मधाळ, नखरेल लावण्यांवर संगीत नृत्याचा बहारदार कार्यक्रम आजच्या आघाडीच्या गायिका आणि नृत्यांगनांनी सादर करत कार्यक्रमात आणखीन रंगत आणली.

भारतरत्न दिवंगत भीमसेन जोशी यांना सप्तरंग कार्यक्रमातून स्वरांजली अर्पण करण्यात आली. विश्वचषक क्रिकेट स्पधेर्तील भारताचा सलामीचा सामना असूनही या कार्यक्रमाला पंडितजींच्या चाहत्यांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रम सुरू होण्याच्या दोन मिनिटं आधी हातात मूव्ही कॅमेरा घेतलेलं एक जोडपं आत आलं आणि पहिल्या रांगेत स्थानापन्न झालं. ते दोघे काश्मीरहून मुंबईत फिरायला आलेले पर्यटकच होते. आदल्या दिवशी गेटवेजवळ फिरताना त्यांनी तिथे लावलेल्या सप्तरंग कार्यक्रमांच्या फलकावर पं. भीमसेन जोशींचे छायाचित्र बघितले. पंडितजींचे निस्सिम चाहते असल्याने त्यांनी तिथे उभ्या असलेल्या पहारेकऱ्याकडे माहिती विचारली. त्याच्याकडून कार्यक्रमाची माहिती मिळाल्याने ते या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडिजींवरील एक माहितीपट दाखविण्यात आला. त्यात तरुणपणचे पं., त्यांचा तरुण आवाज ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले. त्या गृहस्थाने तो माहितीपट आपल्या मूव्ही कॅमेरात बंदिस्त केला. त्यानंतर पं. बद्दल त्यांचे शिष्य सत्यशील देशपांडे थोडक्यात बोलले. जयतीर्थ मेवुंडी, उपेंद भट, श्रीनिवास जोशी, सत्यशील देशपांडे आणि पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी या महान गायकाला स्वरांजली अर्पण केली.

सप्तरंग कार्यक्रमाच्या समारोप समारंभही असाच अविस्मरणीय ठरला, तो तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर लोककला जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यानं! मुंबई विद्यापीठ, कलिना येथील भाषा भवन शेजारचा तळ्याकाठचा रम्य परिसरही तिथे झालेल्या साधु रामा पाटसुते या अस्सल मराठमोठ्या लोककलावंताच्या भावपूर्ण सत्काराने भारावला होता. असंख्य लोककला प्रेमींच्या साक्षीने पाटसुते यांना हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. जणू लोककलेला लोकमान्यता, राजमान्यता, शासनमान्यता आणि विद्वत मान्यताही मिळाली!

गेटवे ऑफ इंडिया येथे लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या गौरवपर कार्यक्रमात विजय चव्हाण, सुरेखा पुणेकर, भार्गवी चिरमुले, गिरिजा ओक, रेशम टिपणीस व मधुरा दातार हे कलावंत सहभागी झाले होते. इथेच झालेल्या 'इंदधनुष्य' कार्यक्रमात झेलम परांजपे, डॉ. संध्या पुरेचा, प्राची शहा, छाया खुटेगावकर, रेश्मा परितेकर यांनी आपल्या नृत्य अदाकारीने अनोखे रंग भरले. गेटवे

येथे २१ फेब्रुवारी रोजी संगीत रजनीच्या कार्यक्रमात हेमा सरदेसाई आणि अभिजित सावंत यांनी लोकप्रिय चित्रपट गीते गाऊन रसिक प्रेक्षकांना खुश केले.

एनसीपीए येथील एक्सपेरिमेंटल थिएटर येथे उत्साही तरुण नाट्यकमीर्ंचा नाट्यमेळा भरविण्यात आला होता. यंदाच्या वर्षातील महाराष्ट्रातील सवोर्त्कृष्ट सात एकांकिका या ठिकाणी सादर करण्यात आल्या. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत कलांगणाच्या प्रांगणात कठपुतळ्यांचे खेळ, शास्त्रीय नृत्य फ्युजन, हास्यकल्लोळ, सुगम संगीत, नकला आदी विविध कलाप्रकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कलावंतांनी सादर करून रसिकांचे मन जिंकून घेतले. रवींद नाट्य मंदिरात कवी संमेलनात फ. मुं. शिंदे, रामदास फुटाणे, महेश केळूस्कर, सुरेश शिंदे, विजय चोरमारे यांनी सादर केलेल्या कवी संमेलनाला काव्य रसिकांनी भरभरून दाद दिली.

जांबोरी मैदान, नरेपार्क, मुंबई विद्यापीठ संकुल, चारकोप या मैदानांमध्ये शाहिरी, लोकनृत्य, कीर्तन, लोकनाट्य, दशावतार, कर्तब कवायत, गण गवळण, भारूड, सप्तखंजिरी भजन, झाडीपट्टीतील लोकगीते, जोगवा, वासुदेव, वाघ्या मुरळी, कांबड नृत्य, म्हादळ नृत्य, तूर नृत्य, गौरी नृत्य, खडी गंमत या लोककला प्रकारांबरोबरच अनुराधा पाल यांचे तबला वादन, पं. राजा काळे व हेमा उपासनी यांचे शास्त्रीय गायन, रवीराज नासेरी यांचे उपशास्त्रीय गायन, शाल्मली जोशी यांचे भक्तीसंगीत व मंगेश चव्हाण यांचे सुगम संगीत गायन कार्यक्रम सादर करण्यात आले.

विविध कलाप्रकारांचे मनोहारी दर्शन घडविणारा हा सप्तरंग महोत्सव मुंबईकर रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील, एवढे मात्र निश्चित!

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...