Tuesday, March 1, 2011

लतादीदी गायल्या


८२ वर्षाच्या असलेल्या लतादीदी फारसे गात नाहीत. पण दिग्दर्शक आणि निर्माता विनीत खेत्रपाल यांच्या आग्रहाखात दीदींनी चक्क आठ वर्षाच्या मुलीसाठी 'सतरंगी पॅराशूट' सिनेमातील 'तेरे हसने पे मुझे हसी आती है' हे गाणे गायले आहे. हे गाणे ऐकताना लतादीदी नाही तर एक आठ वर्षाची चिमुरडीच गात असल्याचा भास होतो.

खेत्रपाल सांगतात, ‘ लतादीदींना आठ वर्षाच्या मुलीसाठी एक गाणे गाणार का ? , असा प्रश्न विचारतानाच थोडसं टेन्शन आलं होतं. दीदी तयार होतील की नाही ? , अशी शंका होती. पण लतादीदींनी गाण्याविषयीची त्यांना हवी असलेली सगळी माहिती जाणून घेतली आणि होकार दिला. ध्वनीमुद्रणाचे काम व्यवस्थित व्हावे म्हणून लतादीदी तीन वेळा स्टुडियोत आल्या आहेत . हे गीत ऐकल्यावर दीदींनी किती आत्मीयतेने गायले आहे हे कळते. ’

लहान मुलांसाठी तयार केलेल्या या सिनेमात एकंदर सहा गाणी आहेत. त्यातले 'तेरे हसने पे मुझे हसी आती है' हे गाणे लतादीदींनी गायले आहे. हे गाणे आठ वर्षाच्या मुलीच्या तोंडी आहे, हे लक्षात घेऊन लतादीदी गायल्या आहेत . ८२ व्या वर्षी देखिल इतकी सहजता त्यांच्या गाण्यात आहे हे लक्षणीयच आहे, असेही खेत्रपाल म्हणाले.

marathijunction
marathijunction.blogspot.com
marathi junction
satrangi parachute

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...