Saturday, February 26, 2011

कलाकारांचा एक्झाम फिव्हर


सध्या सर्वत्र एक्झामचा मौसम आहे. टीव्हीच्या पडद्यावर चमकणाऱ्या अनेक यंग कलाकारांच्या परीक्षा जवळ आहेत. त्यामुळे अनेक सेट्सवर एका बाजूला डायलॉग्जची घोकंपट्टी तर दुसरीकडे अभ्यासाचं पाठांतर असं चित्र पाहायला मिळतंय. मराठी सीरिअल्समधल्या किर्ती नागपुरे (ओळख...ध्यास स्वप्नांचा), आरती मोरे (स्वप्नांच्या पलिकडले) यासारखे अनेक कलाकार अभ्यास आणि शुटिंगमधला समन्वय साधतायंत. यापैकी काही कलाकारांनी सेटवर सध्या कसा एक्झाम फिव्हर आहे ते सांगितलं.

सेटवरच अभ्यास 

डेली सोपचं शुटिंग, नृत्य आणि अभ्यास या तिन्ही गोष्टींचा मेळ साधताना तारांबळ उडते खरी. त्यात आता दिवस परिक्षांचे. त्यामुळे अनेकदा सेटवरच पुस्तकं उघडून बसावं लागतं. शुटिंग मुंबईत असल्याने कॉलेज अटेण्ड करता येत नाही. पण कॉलेज खूप सांभाळून घेतं. मैत्रिणी आणि शिक्षकांकडून नोटस घेऊन अभ्यास भरून काढायचा प्रयत्न करते.
संस्कृती बालगुडे : एसवाय आर्ट्स, एसपी कॉलेज, पुणे 

रियाज चुकवत नाही 

गाण्याचे सगळे प्रोग्राम कॉलेज सांभाळूनच करावे लागतात. म्हणूनच शक्यतो शनिवार-रविवारीच कार्यक्रम घेण्यावर माझा भर असतो. तसंच परीक्षा असली तरीही गाण्याचं शिक्षण आणि सकाळचा रियाजही चुकवून चालत नाही. मग प्रायव्हेट ट्युशन्स, जास्तीचा अभ्यास करून समतोल साधावा लागतो.
प्रथमेश लघाटे, मॉडर्न कॉलेज, पुणे. एफवायजेसी आर्टस. 

समन्वय साधते 

सध्या परीक्षेचे दिवस असल्याने मी फार काही नवं करत नाहीय. पण माझं गाणं मात्र चालूच आहे. संस्कृत, इतिहास आणि पॉलिटिक्स हे तिन्ही माझे आवडीचे विषय असल्याने अभ्यास करणं तसं सोपं जातं. कार्यक्रम, शुटिंग आणि अभ्यास यांच्या शक्यतो मी समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असते. मध्यंतरी 'अमरप्रेम' या सीरिअलचं पुण्यात शुटिंग सुरू होतं आणि दुसऱ्या दिवशी माझा पेपर होता. खूप उशीरा पॅकअप झालं आणि शेवटी रात्री उशिराची बस पकडून मी घरी आले. ती अख्खी रात्र जागून काढली आणि दुसऱ्या दिवशी पेपर दिला.
स्वरांगी मराठे : रुईया कॉलेज, र्फस्ट इयर आर्टस.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...